Accident News: नाशकात तीन वाहनांचा भीषण अपघात; अपघातात एकाचा जागीच मृत्यू

बस, पिकअप आणि ट्रॅक्टर अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली
Accident News
Accident NewsEsakal

Nashik Accident News: नाशिकमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. तीन वाहनांची एकमेकांना जोरात धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बस, पिकअप आणि ट्रॅक्टर अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाणा-देवळा महामार्गावर रात्रीच्या सुमारास सावकी फाटा याठिकाणी बस, ट्रॅक्टर व पीकअप यांचा तिहेरी अपघात होऊन यात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बस मधील प्रवाशांसह ट्रॅक्टरवरील १० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत.

Accident News
Maharashtra Poltical Crisis: राज्यातील सत्तासंघर्षावर महत्वाच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

नाशिकहून नंदुरबारकडे भरधाव जाणा-या बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॅक्टर पुढे जाणा-या पिकअपवर जाऊन धडकला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत.

Accident News
Governor VS Uddhav Thackrey: सत्तासंंघर्षाच्या निकालात हे कळीचे मुद्दे ठरतायत महत्त्वाचे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com