Nashik News : नाशिक- वणी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार!

Car catched fire
Car catched fireesakal

वणी (जि. नाशिक) : सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाच्या कारने नाशिक - वणी मार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ अचानक पेट घेतल्याने कार जळुन खाक झाल्याची घटना घडली. सुदैवांने सदरचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने कारमधील सुर्वजन सुखरुपरीत्या बाहेर पडल्याने जीवीतहानी टळली. झालेल्या प्रकाराने काही काळ मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. (thrill of burning car on Nashik Vani road Nashik News)


हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Car catched fire
Nashik News : जायखेड्यातील जवानाचा आसाममध्ये मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार योगेश प्रकाश गिरासे राहाणार होडनाथे ता.शिरपूर जि.धुळे महेंद्रा लोगन गाडी नंबर एमएच-१५,सीटी ६३३३या गाडीने नाशिकहुन वणी गडावरील देवीच्या दर्शनासाठी जात असताना दिंडोरी जवळली वनारवाडी फाट्याजवळ गाडी घेऊन आलो असताना गाडीत जळण्याचा वास येऊ लागल्याने गाडी चालक योगेश गिरासे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेत गाडीचा बोनट उघडताच त्यातून धुर निघतांना दिसला.

नंतर धुराचे रूपांतर हळूहळू आगीमध्ये होऊ लागले. आगीने अचानक प्रचंड पेट घेतल्याने आजु बाजुला नागरिक उपस्थित होते.त्या सर्व जमलेल्या नागरिकांनी व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस हवालदार मुंढे इ. यांनी पाणी टाकून आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला परंतु नागरिकांना यश आले नाही. बघता बघता गाडी पुर्णपणे जळून खाक झाली.

लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र या अपघातांत जीवीत हानी टळल्याने उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरूण आव्हाड ,पोलीस हवालदार मुंढे हे करीत आहे.

Car catched fire
Nashik News :...अन् चक्क गुलमोहराच्या झाडातून निघू लागलं पाणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com