Nashik Crime News : घरावर दगडफेक करणारे टवाळखोर जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arretsed

Nashik Crime News : घरावर दगडफेक करणारे टवाळखोर जेरबंद

सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील तोरणानगर उदय कॉलनीत नागरिकांना मारहाण करून दुचाकीची तोडफोड करत घरांवर दगडफेक करणारे पाचही संशयित टवाळखोरांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Thugs who threw stones at house jailed Nashik Crime News)

रात्री संशयित रोहित दत्तु हिरे (२१, रा. पवननगर, सिडको), अक्षय तायडे (२१, तोरणानगर, सिडको), कुणाल पाटील (२१, अंबड), रोहित किरण हिरे (२२, पंचवटी), अक्षय पाटील (२४, महाले फॉर्म, सिडको) यांनी दहशत निर्माण करत नागरिकांच्या घरावर दगडांचा मारा केला.

तसेच घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीची मोडतोड केली होती. या वेळी आवाज ऐकून येथील रहिवासी प्रवीण घोरपडे हे घराबाहेर आले असता, त्यांना टवाळखोरांनी घरात घुसून मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड टाकून जबर जखमी केले होते.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

त्यांना त्वरित उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत तपासाची सूत्र फिरवत पाचही संशयित टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कातकडे अधिक तपास करीत आहेत.