Nashik News : गोदाघाटावर अतिरिक्त धर्मक्रिया सभागृह; काकस्पर्शासाठी जागेचा विस्तार | To expand space for additional Dashkriya Hall and kaksparsh at Golaghat in background of Simhastha advice by mla nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

godavari river

Nashik News : गोदाघाटावर अतिरिक्त धर्मक्रिया सभागृह; काकस्पर्शासाठी जागेचा विस्तार

Nashik News : आगामी सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर गोदाघाटावर अतिरिक्त धर्मक्रिया सभागृह व काकस्पर्शासाठी जागेचा विस्तार करण्याबरोबरच मेकॅनिकल गेट बसवून पुररेषेची व्याप्ती कमी करण्याच्या सुचना आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी दिल्या. (To expand space for additional Dashkriya Hall and kaksparsh at Golaghat in background of Simhastha advice by mla nashik news)

गोदावरी नदीकाठी स्मार्ट सिटी योजनेद्वारे करण्यात येणाऱ्या कामांची आमदार फरांदे व आमदार ढिकले यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तीन मीटरपर्यंत पुररेषा कमी होणाऱ्या मेकॅनिकल गेटची पाहणी या वेळी करण्यात आली. मेकॅनिकल गेटचे टेंडर पूर्ण झाले असून, लवकरच या कामास सुरवात होणार आहे.

मेकॅनिकल गेटचे काम पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वात असणारा सिमेंट बंधारा काढण्यात येईल. यामुळे तीन मीटरपर्यंत पुररेषा खाली जाऊन पुरात होणारे नुकसान कमी होणार असल्याचा दावा या वेळी करण्यात आला. गोदाकाठी लावण्यात येणाऱ्या स्टोनची पाहणी करण्यात आली. दशक्रिया विधी शेडची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सुचना आमदार ढिकले यांनी केल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गांधी तलावाजवळ अतिरिक्त वस्रांतर गृह, तसेच सभागृहाच्या वरील बाजूला काकस्पर्शासाठी जागा करण्याच्या सुचना आमदार ढिकले यांनी दिल्या. स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, उपअभियंता नितीन राजपूत आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikGodavari River