टोमॅटोच्या दराला चढली उच्चांकी लाली; शेतकऱ्यांमध्ये समाधान

Tomato prices have risen sharply due to increased demand across the country
Tomato prices have risen sharply due to increased demand across the countrysakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : महिन्याभरापूर्वी बंपर आवकेमुळे टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ५० रुपयांच्या निच्चांकी पातळीवर घसरले होते. पावसामुळे झालेली नासाडीमुळे टोमॅटोचे पीक उद्‌ध्वस्त झाल्याने पिंपळगाव बाजार समितीत आवक एक लाख क्रेटने घटली. त्यातच आखाती देशांसह विविध राज्यातून टोमॅटोची मागणी वाढल्याने दराला झळाळी मिळाली आहे. गत महिन्याच्या तुलनेत तब्बल ५०० रुपयांनी वधारले असून, २० किलोच्या प्रतिक्रेट ९०० रुपये दराची झळाळी मिळाली आहे. मागील सात वर्षांतील टोमॅटोच्या दराला उच्चांकी लाली चढली आहे.

पिंपळगाव बाजार समितीत गेल्या महिन्यात दररोज अडीच लाख क्रेट्‌सपर्यंत तुफान आवक होत होती. दर प्रतिक्रेट्‌स ५० रुपयांच्या खाली आल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत लाल चिखल केला होता. तर काहींनी टोमॅटोचे शेतातील पीक तोडून फेकले. महिन्याभरातच दरात किमया झाली. शेअर बाजारप्रमाणे टोमॅटोचे दराचा आलेख सतत उंचावत आहे. अवघी ४० हजार क्रेट्‌सची आवक पिंपळगाव बाजार समितीत होत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेशात पाठविण्यासाठी टोमॅटो खरेदी करताना व्यापाऱ्यांची चढाओढ लागली आहे. त्यातून टोमॅटो भाव खात आहे.

सात वर्षांनंतर टोमॅटोच्या दराने हजार रुपये प्रतिक्रेट्‌सपर्यंत उसळी घेतली आहे. उत्तर प्रदेशमधील शिवपुरी, रतलाम, बिहार येथील बाजारपेठेत तेथील स्थानिक टोमॅटो येण्यास अद्याप २० दिवस अवधी आहे. त्यामुळे देशभरातील टोमॅटोची मदार नाशिक जिल्ह्यावर आहे. सध्या निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यात टोमॅटो शिल्लक आहे. शेतकरी पिंपळगाव बसवंत, लासलगाव, गिरणारे बाजारपेठत लिलावासाठी आणत असून, तेथून व्यापारी देशभरात टोमॅटो पोचवित आहेत.

Tomato prices have risen sharply due to increased demand across the country
नाशिक : नशेबाज तरुणांच्या भांडणात एकाचा चाकू भोसकून खून

आखाती देशात नाशिकचा टोमॅटो खातोय भाव

परदेशात भारताच्या टोमॅटोला पोषक स्थिती आहे. इराणमधील टोमॅटोचा हंगाम संपला आहे. पिंपळगाव बसवंतसह इतर बाजारपेठेतून दुबई, ओमान या आखाती देशांसह बांग्लादेशमध्ये रोज पाचशे टन टोमॅटो पोचत आहे. देशांतर्गत परदेशात पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने आकर्षक दर टोमॅटोला मिळत आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी

दर कोसळूनही ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पिक बहरविले त्यांच्यासाठी मिळणारा दर पाहता महिनाभर अगोदरच दिवाळी आहे. पिंपळगाव बाजार समितीत यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर साडेपाच महिन्यांत एक कोटी २३ लाख ६४ हजार टोमॅटो क्रेट्‌सची आवक झाली. त्यातून २१८ कोटी ३५ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

Tomato prices have risen sharply due to increased demand across the country
कोजागरीसाठी खानदेशातून कावडधारकांची सप्तश्रृंगी गडावर रिघ

सप्टेंबर महिन्यातील १५ दिवस वगळता टोमॅटोचे दर यंदा तेजीत राहिले. इतर राज्यातील टोमॅटोचा हंगाम सुरू होण्यास अजून महिन्याभराचा कालावधी आहे. त्यामुळे दराचा आलेख चढता राहणार आहे.
-विनोदकुमार, टोमॅटो व्यापारी


दरवर्षाप्रमाणे यंदाही टोमॅटोचे दीड एकरवर लागवड केली. खर्चापेक्षा तिप्पट उत्पन्न यंदा टोमॅटोने दिले. मंदीतही टोमॅटोचे पीक जोपासले, त्याचा फायदा झाला.
-सादिका देशमुख, शेतकरी, आहेरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com