Employees while towing a vehicle at Pandit Colony.
Employees while towing a vehicle at Pandit Colony. esakal

Nashik News: शहरात पुन्हा टोईंग सुरू; बेशिस्तांना दणका! नवीन ठेकेदार मिळेना

Nashik News : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली शहरातील वाहनांची टोइंग गुरुवार (ता. २५) पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहरात बेशिस्तीने वाहने पार्क करणाऱ्यांना दणका बसणार आहे.

दरम्यान, अडीच महिन्यांपूर्वी टोइंग ठेकेदाराला मुदतवाढ न देता नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु सदर प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पुन्हा पूर्वीच्या ठेकेदाराला तीन महिन्यांसाठी टोइंग ठेका देण्यात आला आहे. (Towing resumed in city No new contractor Nashik News)

शहरात १५ मार्चपासून वाहनांची टोइंग पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार बंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून शहरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

तर, वाहतूक पोलिसांकडून फक्त बेशिस्त दुचाकीचालकांविरोधातच कारवाईचा बडगा उगारला जात होता. त्यावरूनही वाहनचालकांमध्ये रोष निर्माण झाला होता. दुसरीकडे पोलिस आयुक्तालयातर्फे टोइंगसाठी नवीन ठेकेदारासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

परंतु अडीच महिने होऊनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. नवीन ठेकेदार न मिळाल्याने अखेर गुरुवारपासून शहरात अचानक नो-पार्किंगमधील वाहनांची टोइंग सुरू करण्यात आल्यानंतर वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Employees while towing a vehicle at Pandit Colony.
HSC Result 2023 : पेठ तालुक्याचा बारावीचा निकाल सर्वाधिक 94.71!

वाहतूक पोलिस वसुलीतच मग्न

वाहतूक पोलिस शाखेचा थेट कारवाई आणि त्यातून दंड आकारण्याची संबंध येतो. टोइंग बंद झाल्यापासून वाहतूक शाखेतील आर्थिक चलनाची रहदारी बंद झाल्याची चर्चा होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांमध्ये पॉइंट घेण्यावरून स्पर्धा सुरू झाली होती.

सिग्नल वा चौकात थांबणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वार टार्गेट केले जात होते. त्याचवेळी सिग्नल तोडणारे, ट्रिपलसीट, विनासीटबेल्ट, नो-पार्किगमधील चारचाकी वाहने याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे वसुलीमध्ये वाहतूक पोलिस मग्न असल्याने अनेकदा समोर आले आहे.

Employees while towing a vehicle at Pandit Colony.
ZP Employees Transfer : जिल्हा परिषदेत ग्रामसेवकांसह 54 जणांच्या विनंती बदल्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com