सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरातील बडदेनगर येथील उद्यानाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली असून, उद्यानाच्या प्रवेशद्वाराची संरक्षण भिंत कोसळली आहे. अनेकदा स्थानिक रहिवासी सांगूनही येथील भिंतीचे काम आजही पूर्ण झालेले नाही. येथील बालगोपालांना खेळण्यासाठी लावलेल्या समस्त खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहे.
येथे सर्वांना आकर्षित करण्यासाठी पाण्याचा कारंजा बसविण्यात आला होता. तो कित्येक वर्षापासून बंद असून तो फक्त नावापुरताच कारंजा म्हणून उरलेला आहे. येथील खेळण्यांमधील लोखंडी साहित्यदेखील चोरीस गेले असल्याचे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत मनपा प्रशासनास कळवूनदेखील उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (toys and fountains in Badadenagar Park destroyed nashik Latest Marathi News)
महात्मा फुले उद्यान व मंगल कार्यालय, बडदेनगर
* खेळणी तुटलेल्या अवस्थेत
* संरक्षण भिंत तुटलेली
* सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य
* स्वच्छतेचा बोजवारा
* कारंजा बंद स्थितीत आहे.
* शोभेच्या झाडांना लावलेले सुरक्षा कुंपण तुटलेले
"उद्यानामध्ये अनेक खेळणी तुटलेल्या असून, या लहान मुलांच्या खेळण्यासाठी काही उपयोगाच्या राहिलेल्या नाही. वारंवार प्रशासनास कळवूनदेखील काही उपाययोजना झालेली नाही. झोके तुटलेले, गोल चक्री व काही खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने या उद्यानाचा उपयोग नागरिकांना होत नाही."- सुवर्णा निमगोलकर, गृहिणी
"उद्यानाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कचरा आणून टाकतात. हा कचरा कित्येक दिवस तसाच पडून असतो. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी येथून कचरा उचलून नेणे गरजेचे असताना, मात्र महिना, दोन महिन्यातून स्वच्छता कर्मचारी येऊन येथे साफसफाई करताना दिसून येतात."- कांचन तलमले, गृहिणी
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
"लहान मुलांच्या या उद्यानामध्ये पाण्याचा कारंजा बसवण्यात आलेला होता. मात्र अनेक वर्षांपासून हा कारंजा कार्यरत नसून तो फक्त नावापुरातच उरलेला आहे. खेळण्यांमधील तुटलेले साहित्य उद्यानात फेकून देण्यात आलेले आहे."- अनिता वानले, गृहिणी
"उद्यानामध्ये बसविलेले शोभेच्या झाडांची उद्यान विभागाने देखभाल न केल्यामुळे सुकून गेलेली आहेत. झाडांना बसवण्यात आलेले कुंपणदेखील तुटलेले आहे. मात्र, कुंपण बसवण्याची तसदी पुन्हा उद्यान विभागातर्फे घेण्यात आलेली नाही." - प्रियांका जाधव, गृहिणी
"उद्यानातील पालापाचोळा एका ठिकाणी गोळा करून तो घंटागाडी कर्मचाऱ्यांनी उचलून नेणे अपेक्षित असताना मात्र सदर कचरा येथेच जाळण्यात येत असतो. यामुळे प्रदूषण होत असून हा कचरा जाळणाऱ्यांवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. महापालिका प्रशासन त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असते, हे स्पष्ट दिसून येते."- दीपाली सोज्वळ, गृहिणी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.