Nashik Crime News : विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

Nashik Crime News : विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात वाळू लिलाव बंद असताना देखील अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व रमजानपुरा पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने देवीचा मळा शिवरस्ता व पंचतन चौक या दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत दोन ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू असा सुमारे ११ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. व दोघा जणांना अटक केली. (Tractor transporting sand without license seized Nashik Crime News)

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

पंचतन चौक भागात किरण मोरे (२६, रा. पवारवाडी) हा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळू वाहतूक करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून पाच लाख ५५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देवीचा मळा शिवरस्ता भागात अब्दुल सत्तार मोहमद (वय ३१, रा. नुरनगर द्याने) हा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने (एमएच २९ व्ही ०८४९) विना परवाना अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना मिळून आला. रमजानपुरा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.