Traffic Jam : मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी; बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठा खोळंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic congestion on Mumbai Nashik highway due to container closure nashik news

Traffic Jam : मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी; बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठा खोळंबा

इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई- नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा ते तळेगाव फाटा दरम्यान कंटेनर बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली. (Traffic congestion on Mumbai Nashik highway due to container closure nashik news)

यामुळे महामार्गावर दीड किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनचालक लवकर जायच्या नादात मुंबई- नाशिक महामार्गावर कंटेनर बंद पडल्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडी लवकर सुटण्यासाठी विरुद्ध दिशेने वेडीवाकडी वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व्हिस रोड वरून अवजड वाहने नेल्याने सर्व्हिस रोडवरही वाहतूक कोंडी झाली. महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी गेल्या दीड तासापासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :NashikMumbaiTraffic