traffic on highway was blocked due to truck overturning
traffic on highway was blocked due to truck overturning esakal

Nashik Accident News : मालट्रक पलटी झाल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प

Nashik News : नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात शनिवारी (ता. २९) पहाटे चारच्या सुमारास कसारा फाट्याजवळ महामार्गाच्या मधोमध एक मालट्रक पलटी होऊन रस्त्याच्या मध्येच पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. (traffic on highway was blocked due to truck overturning nashik news)

मोठ्या प्रमाणात लोड असलेल्या या ट्रकमधील धान्याच्या गोण्या हलविल्यानंतर क्रेनच्या मदतीने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत्‌ करण्यात आली. शनिवारी पहाटे नाशिककडून मुबईकडे कडधान्य (काबुली चने) घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात कसारा घाट उतरून आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे ट्रक ओहळाची वाडीच्या वळणावर पलटी झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी महामार्गांवरच ट्रक आडवा झाल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतुक तीन ते चार तास ठप्प झाली होती. परिणामी काही वाहन चालकांनी मुंबई- नाशिक लेनवरून वाहने वळविल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती.

याबाबत माहिती मिळताच कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य शाम धुमाळ, स्वप्नील कळंत्री, देवा वाघ, दत्ता वातडे, दत्ता कामडी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महामार्ग पोलीस शहापूर व घोटी केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

traffic on highway was blocked due to truck overturning
Nashik Crime News : डेअरी व्यावसायिकाला द्राक्ष खरेदी पडली महागात

वाहनचालकही उतरले मदतीला

ओव्हरलोडींग असलेल्या ट्रकमधील धान्याच्या गोण्या रस्त्यावर आल्याने व ट्रक क्रेनच्या मदतीनेही जागचा हालत नसल्याने पोलिसांनी अखेर ट्रकमधील गोण्या खाली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी मजूर मिळत नसल्याने आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी पुढाकार घेत गाडी खाली करण्याचे काम सुरु केले.

त्यानंतर महामार्ग पोलीस, कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्यासह वाहतूक कोंडीत अडकलेले वाहन चालकसुद्धा मदतीला धावले. ४०० हून अधिक गोण्या खाली केल्यानंतर क्रेनच्या मदतीने रस्त्यातील ट्रक हटवण्यात आला. त्यानंतर एक किलो मीटरपर्यंत रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर माती टाकून नाशिक-मुबई लेन सुरु करण्यात आली.

घोटी टोल कंपनीची मदत नाही

दरम्यान, अपघात झाल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडलेले ऑइल हटवण्यासाठी किंवा ट्रक बाजूला घेण्यासाठी घोटी टोल कंपनीची वेळेवर मदत पोहचलीच नाही. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.

traffic on highway was blocked due to truck overturning
Nashik Accident News : भाजीपाल्याची पिकअप उलटून शेतकरी जखमी; तिघे गंभीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com