Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीच्या पार्श्‍वभूीवर वाहतूक मार्गात बदल; हे आहेत पर्यायी मार्ग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Jayanti 2023

Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीच्या पार्श्‍वभूीवर वाहतूक मार्गात बदल; हे आहेत पर्यायी मार्ग...

नाशिक : रविवारी (ता. १९) शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक (Traffic) कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. (Traffic routes have been changed to avoid traffic jams on major roads for shiv jayanti nashik news)

शिवजयंतीची मुख्य मिरवणूक शहरातील भद्रकालीतून निघणार आहे. यासह पंचवटी, नाशिक रोड आणि अंबड परिसरातूनही शिवजयंतीच्या मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्‌भवू नये यासाठी काही रस्त्यांवर बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे, तर काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे.

मुख्य मिरवणूक (वाकडी बारव)

बंद मार्ग : वाकडी बारव- महात्मा फुले मंडई- भद्रकाली मार्केट- बादशाही कॉर्नर- गाडगे महाराज पुतळा- मेनरोड- धुमाळ पॉइंट- सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल- अशोकस्तंभ- रविवार कारंजा- मालेगाव स्टॅन्ड- पंचवटी कारंजामार्गे मालवीय चौकातून रामकुंडापर्यंत.

पर्यायी मार्ग : निमाणी व पंचवटी कारंजापासून बस पंचवटी डेपोतून सुटतील. सर्व वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे नाशिक रोड व शहरातील इतर भागात जातील.

पंचवटी परिसर

बंद मार्ग : दिंडोरी नाक्याकडून पंचवटी कारंजा- मालेगाव स्टॅन्ड- रविवार कारंजाकडे. मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

नाशिक रोड परिसर

बंद मार्ग : बिटको चौक व सिन्नर फाट्यासह रेल्वेस्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून जाणारा रस्ता. बिटको चौकातून जेल रोडमार्गे नांदूर नाका आणि नांदूर नाक्याकडून बिटको चौकाकडे जाणारे दोन्ही बाजूचे रस्ते.

पर्यायी मार्ग : सिन्नर फाट्याकडून उड्डाणपुलावरून दत्तमंदिर चौकातून सुराणा हॉस्पिटलमार्गे आनंदनगर टी पॉइंटकडून रिपोर्टे कॉर्नरकडून नाशिकरोड रेल्वे स्टेशन.

- जेल रोडमार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळे नगरातून कॅनॉ लरोड ते हरी विहारसमोरून नारायणबापूनगर ते टाकळीमार्गे औरंगाबाद रोडकडे.

- नांदूर नाका ते बिटको चौकाकडील वाहतूक आढाव पेट्रोलपंप मार्गे शनी मंदिर- राजराजेश्वरी चौक- कॅनॉल रोड मार्गे बिटको चौकातून मार्गस्थ होईल.

इंदिरानगर-पाथर्डी फाटा

बंद मार्ग : गरवारे पॉइंट ते पाथर्डी फाटा सर्कल, कलानगर, फेम सिग्नल या रस्त्यावरील अवजड वाहनांना प्रवेश बंद. तर, पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा मार्गे अंबड- सातपूर लिंक रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद. पर्यायी मार्ग : गरवारे पॉइंट उड्डाणपुलावरून द्वारकाकडे मार्गस्थ होईल. अंबड परिसर-

बंद मार्ग : सायंकाळी पाच ते मध्यरात्री बारापर्यंत पवननगर भाजी मार्केटपासून उत्तमनगर बसस्टॉपर्यंत. पर्यायी मार्ग : पवननगर भाजी मार्केटकडून तोरणानगर, मटण मार्केटकडे. उत्तमनगरातील वाहतूक शुभम पार्कमार्गे कामटवाड्यातून मार्गस्थ होईल.

"वाहनचालकांनी रविवारी (ता.१९) शहरातील मिरवणुकीचे मार्ग वगळता पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवणार नाही. वाहनचालकांनी सहकार्य करावे." - सीताराम गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा.