esakal | गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक; पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मुद्देमाल
sakal

बोलून बातमी शोधा

gutkha

पोलिसांनी पकडला गुजरातमधून महाराष्ट्रात येणारा लाखोंचा गुटखा

sakal_logo
By
विनोद बेदरकर

सुरगाणा (जि. नाशिक) : गुजरात येथून होणारी बेकायदा गुटख्याची वाहतूक रोखण्यात सुरगाणा पोलिसांना यश आले आहे. मालट्रक मधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून वाहनासह राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा असा सुमारे ३४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अशी केली पोलिसांनी कारवाई

संदीप मुंजेभाऊ गायकवाड (३१ रा. मखमलाबाद, नाशिक) व कुणाल संजय मेणे (२४ रा. खर्डे ता.देवळा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. १) सापुतारा नाशिक मार्गावरील ठाणापाडा शिवारात सापळा लावण्यात आला होता. पोलिसांनी मालट्रकला (एमएच १५ एचएच २४१६) अडवून तपासणी केली असता गुटख्याचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुजरात राज्यातून विविध प्रकारचा गुटखा खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात ट्रकमध्ये सुमारे २३ लाख ७६ हजाराचा गुटखा आढळून आला आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदिप कोळी, सहाय्यक निरीक्षक नीलेश बोडखे, हवालदार ढुमसे, पोलिस नाईक गोतारणे, शिपाई ढेपले, गवळी आदींच्या पथकाने केली. निरीक्षक संदिप कोळी तपास करीत आहेत.

हेही वाचा: जलसंपदाचे कोणतेही कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही- जयंत पाटील

हेही वाचा: भुजबळ-कांदे किरकोळ वाद; राष्ट्रवादी पाठीशी - जयंत पाटील

loading image
go to top