esakal | केवळ दैव बलवत्तर म्हणून मृत्यूला हुलकावणी! थोडक्यात बचावला

बोलून बातमी शोधा

bike
केवळ दैव बलवत्तर म्हणून मृत्यूला हुलकावणी! थोडक्यात बचावला
sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : मखमलाबाद रोडवरील मंडलिक मळ्याकडून पेठ रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झाडाच्या रुपात जणू काळ तरुणाच्या समोर उभा होता. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला..

केवळ दैव बलवत्तर म्हणून...

मखमलाबाद रोडवरील मंडलिक मळ्याकडून पेठ रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यंकटेश टेक्सटाइलसमोरील झाड वादळी वाऱ्यामुळे वीजवाहक तारांवर कोसळले. या अपघातात तारा दुचाकीभोवती गुंडाळल्या गेल्याने याच दरम्यान अमोल लहामगे (वय ३९) हा युवक हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १५, बीपी ८३२३) ने जात असताना अपघात झाला. यात अमोलच्या हातपाय व तोंडास मार बसला. या वेळी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन व्ही. एम. डांगळे, एम. के. सोनवणे, व्ही. आर. गायकवाड, पी. बी. लहामगे, वाहनचालक आर. आर. पाटील, वीज वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश बर्वे, कर्मचारी अनंत वाघेरे, कैलास नेहरे, राजाराम चौरे, सुनील गायकवाड आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन झाड कापून बाजूला केले, तसेच तुटलेल्या तारांची दुरुस्ती केली. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनीही घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा: ‘बालविवाह' प्रकरण : गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेनी मागितले 25 लाख ; गुन्हा दाखल

वादळ वाऱ्यामुळे झाड कोसळले

बुधवारी (ता. २८) सायंकाळी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे मखमलाबाद रोडवरील मंडलिक मळ्याकडून पेठ रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यंकटेश टेक्स्टाइलसमोरील झाड वायरवर कोसळून पडले. याचदरम्यान रस्त्यावरून दुचाकीवरून जाणारा युवक अमोल लहामगे (वय ३९, रा. क्रांतिनगर) जखमी झाला आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

कर्मचाऱ्याची अशीही तत्परता

झाड वीजवाहक तारांवर पडल्याने तारा एकमेकांवर घासून शॉटसर्किट झाले. सदर घटना वीज वितरण विभागाचे कर्मचारी अनंत वाघेरे यांना मंडलिक मळा परिसरातील नागरिकांनी कळविल्यावर ते तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वीजपुरवठा खंडित करून वायर कापून बाजूला केल्याने अनर्थ टळला. यामुळे मंडलिक मळ्याकडून पेठ रोडकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती.