Nashik Accident News : वणी- नाशिक रस्त्यावर ट्रकची मोटरसायकलला धडक; 1 ठार 1 जखमी | Truck collides with motorcycle on Vani Nashik road 1 killed 1 wounded Nashik Accident News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 accident

Nashik Accident News : वणी- नाशिक रस्त्यावर ट्रकची मोटरसायकलला धडक; 1 ठार 1 जखमी

Nashik Accident News : वणी - नाशिक रस्त्यावरील अवनखेड शिवारात हॉटेल सिल्विया समोर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. (Truck collides with motorcycle on Vani Nashik road 1 killed 1 wounded Nashik Accident News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शनिवार, ता. १३ रोजी दुपारी पावने तीन वाजेच्या दरम्यान पिंगळवाडी, ता. दिंडोरी येथील नवनाथ मोहन भरसट, वय २७ व आकाश प्रकाश भरसट हे कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर पिंगळवाडी येथे मोटर सायकल क्रमांक एम एच १५ सीवाय ११२३ हीने घरी जात असतांना, समोरुन आलेली ट्रक क्र. एम एच ११ अेएल २८७७ हीने जोरदार धडक दिली.

यात नवनाथ भरसट हा डोक्यास व हाता पायास मार लागून जागीच ठार झाला. तर आकाश भरसट हा गंभीर जखमी झाला असून दिंडोरी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारा करुन त्यावर नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांत ट्रक चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

टॅग्स :NashikAccident Death News