Tuberculosis Patients : समाधानकारक! नाशिक शहरात 3593 क्षयरुग्णांचे निदान

Tuberculosis patient
Tuberculosis patientsakal

नाशिक : शुक्रवारी (ता.२४) जागतिक क्षयरोग दिन असून, या पार्श्वभूमीवर केंद्राच्या क्षयमुक्त भारत योजनेंतर्गत महापालिकेकडून ३,५९३ क्षयरुग्णांचे निदान करण्यात आले. केंद्र सरकारचे २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट असून याअंतर्गत क्षय रुग्णांना शासनाकडून ५०० रुपये आर्थिक मदत, सकस आहार योजनेत जवळपास ६५३ क्षयरुग्णांना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून शिधा पुरविला जातो.

Tuberculosis patient
Weight Loss and Cancer: वाढणारा लठ्ठपणा योग्य वेळी अशा पद्धतीने रोखा, नाहीतर वाढेल कर्करोगाचा धोका!

२०२२ या वर्षात नाशिक महापालिका क्षयरोग विभागाअंतर्गत खासगी दवाखाने व महापालिका दवाखान्यात एकूण ३,४५० रुग्ण निदान करण्याचे उदिष्ट होते. त्यापैकी ३,५९३ क्षयरुग्णांचे निदान करून १०४ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी प्रत्येक रुग्ण दत्तक घेण्यासाठी निक्षय मित्र अशी योजना राबविण्यात येत असून, दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थानी रुग्ण दत्तक घेतले आहेत.

Tuberculosis patient
World Tuberculosis day 2021: दररोज सुमारे 4 हजार जण  क्षयरोगामुळे गमावतात जीव

निक्षय मित्राकडून रुग्णाला सहा महिने पोषण आहार पुरविला जातो. या पोषण आहारात तेल, बाजरी/ ज्वारी, शेंगदाणे, कोणतीही एक डाळ यांचा समावेश आहे. खासगी दवाखान्यात निदान आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

याकरिता सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, प्रयोगशाळा, रेडिओलॉजिस्ट यांनी स्वतःहून पुढे येऊन निदान झालेल्या व उपचार घेत असलेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शासनास कळविणे बंधनकारक आहे. जेणेकरून सर्व क्षयरुग्णांना योग्य उपचार व उपचार संपेपर्यंत पाठपुरावा क्षयरोग विभागामार्फत करणे शक्य होईल, असे महापालिका सुत्रांकडून सांगण्यात आले.

Tuberculosis patient
Tuberculosis Nutrition Diet : ‘निक्षय मित्र’ कडून क्षयरुग्णांना पोषण आहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com