Nashik Crime News : महामार्गावर मोबाईल लुटणाऱ्या दोघांना दुचाकीसह अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : महामार्गावर मोबाईल लुटणाऱ्या दोघांना दुचाकीसह अटक

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीवर येऊन मोबाईल लुटणाऱ्या दोघा संशयितांना मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकी, दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोनशे रुपये किमतीचा चाकू असा सुमारे १७ हजार २०० रुपयाचा ऐवज जप्त केला. (Two arrested for robbing mobile phones on highway along with bike Nashik Crime News)

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

मुंबई-आग्रा महामार्गावरील सौंदाणे ते झोडगे या भागात सातत्याने दुचाकीस्वारांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. दोन आठवड्यापूर्वी चिखलओहोळ शिवारात मोबाईल लुट करतानाच संशयितांनी मोबाईल लुटण्यास विरोध करणाऱ्याला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला होता.

ग्रामस्थ धावल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर शहरातील साजिद शब्बीर खान (वय ३७, रा. म्हाळदे शिवार) हा गॅरेज व्यावसायिक दुचाकीवर जात असताना त्याच्या पाठीमागून दुचाकीवर (एमएच ४१ यु ९८१७) आलेल्या परवेज मोहम्मद अब्दुल सलाम उर्फ नेपाळी (रा. गोल्डननगर) व उबेदुर रेहमान शेख इब्राहिम ऊर्फ दुर्री (रा. बिसमिल्लानगर) यांनी साजीदच्या शर्टच्या खिशातील मोबाईल हिसकावला.

धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जबर जखमी केले. खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नेपाळी व दुर्री या दोघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याजवळून दुचाकी, मोबाईल व चाकू जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध जबरी चोरी व हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.