Nashik News : ओझर येथील चव्हाण मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाची वासरी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard News

Nashik News : ओझर येथील चव्हाण मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाची वासरी ठार

ओझर (जि. नाशिक) : येथील श्री एकनाथ गोविंद चव्हाण, रा. चव्हाण मळा ,जुना जानोरी रोड, महादेव मठाजवळ, यांच्या गोठ्यातील अडीच वर्षाची छोटी वासरीवर काल संध्याकाळी बिबट्याने हल्ला करून ठार केले. या भागात बिबट्याचा वावर असल्याबाबत अनेक वेळा सुचना देऊनही पिंजरा लावत नसल्याने परिसरातील जनावरे पालक धास्तावले असून जनावरांचे रक्षण कसे करावे हा प्रश्न पशुपालकांना सतावत आहे. (Two half year old calf killed in leopard attack in Chavan farm in Ozar Nashik News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

येथील चव्हाण परिवाराचा दुग्ध व्यवसाय शेती व्यवसायाचा जोडधंदा आहे. त्यांच्याकडे आज मितीस ४४ म्हैस 30 गाई २५ बकऱ्यांचा गोठा असा पशुपालन व्यवसाय आहे. कुटुंबाचा पूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह यावरच चालतो. शासनाने आणि वन विभागाने याकडे तत्पर लक्ष देऊन कारवाई करावी ही विनंती यापूर्वीही अनेक वेळा करण्यात आली.

बिबट्या वावरत असल्याच्या घटना घडलेल्या असून त्यावर काही कारवाई करण्यात आली नव्हती, तरी तत्पर शासन आणि वन विभागाने कारवाई करावी पिंजरा लावावा, अशी मागणी चव्हाण कुटुंब व परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांनी लोकहितार्थ केली आहे. अन्यथा यापुढेही बिबट्याच्या दहशतीची टांगती तलवार कायम राहिल व पशुपालन व्यवसाय धोक्यात येईल.

टॅग्स :NashikdeathLeopard