Nashik Crime News : वृक्षतोड करणाऱ्या दोघांना कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court order

Nashik Crime News : वृक्षतोड करणाऱ्या दोघांना कारावास

नाशिक : पंचवटीतील पांजरापोळ परिसरातील बेकायदेशिररित्या 30 झाडांची कत्तल करणाऱ्या दोघांना न्यायालयाने एका महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. (Two jailed for tree cutting Nashik Crime News)

मोठाभाऊ उर्फ दत्तू नारायण शिरसाठ (४४, रा. म्हाडा कॉलनी, सातपूर-अंबड लिंक रोड), भारती जयंत पटेल (४८ रा. रैनबो रो हाउस नं 1, पोकार कॉलनी, दिंडोरी रोड) अशी आरोपींची नावे आहेत. २९ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी पाच वाजेचे दरम्यान पंचवटीतील पांजरापोळ येथे दोघांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता सुबाभुळ - ११, विलायती चिंच - ६, काशिद - ६, काटेरी बाभुळ - २, कडुनिंब - १, बोर - २, बॉटल ब्रश - ०२ असे एकूण ३० वुक्ष बुंध्यापासुन तोडून नुकसान केले होते.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

पंचवटी पोलिस ठाण्यात झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमान्वये गुन्हा दाखल होता. पोलीस हवालदार एस. जी. मेतकर यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन मंगळवारी (ता. १४) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी परिस्थितीजन्य पुराव्यानुसार दोघा आरोपींना एका महिन्याचा साधा कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून सुनिता एस. चिताळकर यांनी कामकाज पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार पी. पी. गोसावी, व्ही.ए. नागरे यांनी पाठपुरावा केला.