बिबट्याचे एकाच रात्री दोन हल्ले; शाळकरी मुलगा अन जवानाची पत्नी जखमी, परिसरात दहशत | Two leopard attacks in one night schoolboy soldiers wife injured panic in area at naigaon Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Villagers erecting a cage along with forest guard Sanjay Gite in a field near Naigaon Shinde Road after the attack in Shiwara at Naigaon (T. Sinnar).

Nashik Leopard News: बिबट्याचे एकाच रात्री दोन हल्ले; शाळकरी मुलगा अन जवानाची पत्नी जखमी, परिसरात दहशत

वडांगळी : नायगाव (ता.सिन्नर )येथील शिवारात बिबट्याने मोटारसायकलहून प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर एकाच वेळी रात्रीचे दोन हल्ले करून सावज हेरण्याचा प्रयत्न केला आहे.

बिबट्याच्या पहिल्या हल्लात शाळकरी व दुसरा हल्ल्यात सैन्यातील जवानाची शेतकरी पत्नी जखमी झाले आहे. दोन्ही जखमींचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Two leopard attacks in one night schoolboy soldiers wife injured panic in area at naigaon Nashik News)

नायगाव खोरे भागात हल्लेखोरे बिबट्याने रात्रीच्या वेळेस दहशत निर्माण केली आहे. या शिवारात सिन्नरच्या वनविभागाने हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे उभारले आहे. मात्र वनविभागाच्या सापळ्याला हुलकावणी देत आहे.

नायगावसह जायगाव जोंगलेटेंभी सोनगिरी वडझिरे देशवंडी बाम्हणवाडे या भागात दोन महिन्यांपासून बिबट्या चा वावर वाढला आहे. त्यात ह्या बिबट्याने सावज हेरण्यासाठी मोटारसायकलहुन प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष केंद्रित केले आहे.

गुरुवारी 28 सष्टेंबरला बिबट्या हल्लात शाळकरी नारायण पाबळे जखमी झाला.नायगाव शिवारात वडझिरे रस्त्याला भिमाशंकर नर्सरीजवळ सोमवारी ता. 2 ला रात्री साडे सातच्या सुमारास घटना घडली आहे.

जायगाव शिवारात अजय चिमण सिंह यांच्यासह त्यांची मुले लखन व चेतन शेतकाम करून घराकडे नायगावला येत होते. बिबट्याचा वावर असल्याने वेगाने घराकडे परतत होते. त्यावेळी नर्सरी जवळ आले असताना गीनी गवतात लपून बसलेला बिबट्याने हल्ला चढवला.\

त्याने शाळकरी मुलगा लखन( वय 13)ला उजव्या पायाला तीक्ष्ण पंजाने वार केला. त्यामुळे तिघे मोटारसायकलहुन पडले. बिबट्या आहे असे ओरडत मोटारसायकल उचलून वेगात निघाले. बिबट्या गीनी गवतात दिशेने पळाला.

ह्या बिबट्याने नायगाव सायखेडा रस्ता जवळ रात्री दहाच्या सुमारास पुन्हा मोटारसायकलवर हल्ला केला. सावळी चाटोरी (ता.निफाड) येथील सैन्यातील जवान शिवाजी चाटे सुट्टीवर आले आहे. ते नायगाव ला पत्नी प्रगती चाटे (वय 28) यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले. त्यावेळी दोघे पती पत्नी नायगाव शिवारात चिंचेच्या झाडाजवळ आले असताना पुनम चाटे यांच्यावर हल्ला चढवला.

त्यात पुनमच्या डाव्या गुडघ्यावर बिबट्याने वार केला. सैन्यातील जवान शिवाजी चाटे यांनी सुसाट वेगाने गाडी सावळीकडे नेली‌. हल्लेखोर बिबट्याने एकाच रात्री दोन ठिकाणी हल्ले केले आहे. नायगाव भागात सातत्याने बिबट्याचे हल्ले सुरू आहे. रात्री सातनंतर शिवारात रस्ताने प्रवास करणे भीती दायक झाला आहे. वनविभागाने या भागात पिंजरे उभारले आहे. पण हा बिबट्या त्यात येत नाही.

"नायगावला बिबट्याने दहशत निर्माण केली आहे.बाजारपेठेत सात नंतर शेतकरी वर्ग घराकडे जात आहे. शिवारात सर्व रस्ताला बिबट्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहे. वनविभागाने त्यांना लवकर पकडावे." - दत्तात्रय गवळी, व्यापारी, नायगाव

"नायगाव शिवारात एकाच बिबट्याने दोन हल्ले केले आहे.दोन पिंजरे उभारले आहे. आज हल्ल्यानंतर दोन्ही पिंजरा जागा बदलल्यात आल्या आहे. सापळा रचले आहे. पण त्यात तो येत नाही." - संजय गिते, वनरक्षक, नायगा

टॅग्स :NashikLeopard