Nashik Crime: कुत्तागोळी विक्री करणाऱ्या दोघांना मालेगावात अटक | Two people selling kutta golli arrested in Malegaon Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Nashik Crime: कुत्तागोळी विक्री करणाऱ्या दोघांना मालेगावात अटक

Nashik Crime : शहरातील रमजानपुरा परिसरातील रजियाबाद भागात गुंगीकारक नशेच्या गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने काही तरुण येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांना मिळाली.

माहितीची खातरजमा होताच श्री. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी उपअधिक्षक विशाल क्षिरसागर, विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे यांच्यासह विशेष पथकाने छापा टाकून कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली.

त्यांच्या ताब्यातून अकराशे रुपये किंमतीच्या नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. रमजानपुरा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two people selling kutta golli arrested in Malegaon Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विशेष पथकाने फरहान शेठ यांच्या कारखान्याजवळ मंगळवारी (ता. २३) रात्री साडेसातच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत नशेच्या गोळ्या बाळगणाऱ्या शोएब रियाज शहा (वय २१, रा. गौतमनगर, द्याने रमजानपुरा) व साकीर सलीम शेख (वय १९, रा. नवी तहेजीब स्कुलजवळ, चंदनपुरी गेट) यांना अटक केली.

दोघांजवळ १७ स्ट्रिपमध्ये १ हजार १०५ रुपये किंमतीच्या १७० कुत्ता गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

रमजानपुरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही, हवालदार कैलास ह्याळीज, सोमवंशी, औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर, पोलिस शिपाई दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, प्रशांत बागूल, आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :crime news in marathi