Nashik Crime: ट्रायलच्या बहाणे दुचाकी चोरट्याला अटक | Two wheeler thief arrested on pretext of trial Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 arrested

Nashik Crime: ट्रायलच्या बहाणे दुचाकी चोरट्याला अटक

Nashik Crime : ट्रायलच्या बहाण्याने दुचाकी लंपास करणाऱ्या संशयितास मुंबई नाका पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतली आहे.

त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अझहर कलीम सय्यद (वय.२७, रा. वडाळा गाव) असे संशयिताचे नाव आहे. (Two wheeler thief arrested on pretext of trial Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑनलाइन दुचाकी खरेदी करण्याचे भासवून संशयित अझहर सय्यद याने प्रत्यक्ष दुचाकी मालकाची भेट घेतली. ट्रायलच्या बहाण्याने त्यांची दुचाकी (एमएच २६, सीडी २७७६) लंपास केली. गजानन दहिफळे यांच्या तक्रारीवरून २४ मार्चला मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अंमलदार समीर शेख यांना संशयित वडाळा गावात असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, कर्मचारी रोहिदास सोनार, समीर शेख, नवनाथ उगले, योगेश अपसुंदे, गणेश बोरणारे यांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

त्याची सखोल चौकशी केली. त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडून (एमएच २६, सीडी २७७६) (एमएच १७, एएम ८४००) अशा दोन दुचाकी हस्तगत केल्या.