
Nashik Crime News : अंगात आल्याने हिरेनगरला दोघा महिलांना मारहाण; कारवाईची अंनिसची मागणी
Nashik Crime News : हिरेनगर (ता. नांदगाव) येथील दोघा महिलांना अंगात येते म्हणून त्यांच्याच नातेवाइकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर अंधश्रद्धाविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंनिसने केली आहे.
तसेच याबाबात पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्याकडे समितीने निवेदन सादर केले आहे. (Two women beaten up in Hirenagar for sexual harassment anti superstition committee demand for action Nashik Crime News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
हिरेनगर येथील एका कुटुंबातील महिला व त्याच्या मुलीच्या अंगात आल्याने त्यांना नातेवाईकांनी भुताळीन, डाकीन म्हणून हिणवत बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे भेदरलेल्या पीडितांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आपले गाऱ्हाणे मांडले.
त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस ठाण्यात धाव घेऊन महिलांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध अंधश्रद्धाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या निवेदनावर देविदास मोरे, मारुती जगधने, किरण भालेकर, राजेंद्र जाधव, प्रज्ञानंद जाधव, प्रदीप थोरात, भगिरथ जेजुरकर, प्रा. सुरेश नारायने, दत्तात्रेय इपर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत