esakal | धक्कादायक! चोर समजून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आठ संशयितांना अटक

बोलून बातमी शोधा

Nashik crime news
धक्कादायक! चोर समजून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न; आठ संशयितांना अटक
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील देवारपाडे शिवारात हॉटेलवर चहा पिण्यासाठी व लघुशंकेसाठी थांबलेल्या दोन तरुणांना जनावर चोरटे असल्याचे समजून आठ जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात तौसिफ नरुद्दीन शेख (१९, रा. हजारखोली) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या मारहाणीत जखमी झालेल्या मोईन कुतुबुद्दीन काझी (१९, रा. हजारखोली) याच्या तक्रारीवरून आठ संशयितांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल, संगनमताने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आठही संशयितांना अटक केली आहे.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त

मोईन व तौसिफ हे देवारपाडे शिवारातील राजस्थान बिकानेर हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबले होते. तौसिफ लघुशंकेसाठी हॉटेलनजीकच्या नाल्याकडे गेला. त्यावेळी त्याला तो जनावरे चोरणारा आहे असे समजून भावडू पिंजन (वय ३५) याने लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. तोंडावर पाईप मारल्याने तौसिफ जबर जखमी झाला. मोईन हा समजावून सांगण्यासाठी आला असता तेथे परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. सर्व संशयितांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी व हाता चापटीने जबर मारहाण, शिवीगाळ व दमबाजी केली. मोईन काझीच्या तक्रारीवरून भावडू पिंजन (३५), कौतिक पठाडे (३१), भाईदास घुमरे (३२), रवींद्र पठाडे (३५), जितेंद्र घुमरे (३०), चेतन वाळके (२७), राजेंद्र चिकने (४०), सोपान काळे (३३, सर्व रा. देवारपाडे) यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकारानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक शशिकांत शिंदे, लता दोंदे, पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे आदींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलविले. तक्रार दाखल झाल्यानंतर काल दिवसभरात तातडीने सर्व संशयितांना अटक केली.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"