
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले ; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत शिंदे गटावर व निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची मालेगावात पहिली सभा होत आहे. निवडणूक आयोगाचे गांडूळ झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाचे गांडूळ झालेलं आहे. कारण निवडणूक आयोगाच्या डोळ्यात जर मोतीबिंदु झाले नसतिल तर त्यांनी खेडची सभा पाहिली, येथील (मालेगाव) सभा पहावी आणि मग निर्णय द्यावा. अन्यायाच्या पद्धतीने निवडणूक आयोग वागले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीने वस्त्रोद्योगाला वीज दरात सवलत दिली होती. आज परत दर काय झाले आहेत? वस्त्रोद्योग आयुक्तालय देखील हे दिल्लीला घेऊन गेले आहेत. मग इथे जे वस्त्रोद्योग करणारे आहेत, मालक, कामगार असतिल. देशात वस्त्रोद्योग सर्वाधिक आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा. या सगळ्या राज्यातील उद्योजकांना मुंबई जवळ पडते पण मुंबईच वस्त्रहरण करायच, महाराष्ट्राच वस्त्रहरण करायच, आणि हे मिंधे बें बें करत बसतात. हे असले मिंधे सरकार यापूर्वी महाराष्ट्रात आलेले नव्हते, असे ठाकरे म्हणाले.
"उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, फक्त वस्त्रोद्योग आयुक्त नेलेतं. कशाचा कशाला ताळमेळ नाही. बिना ऑफिसच आयुक्त तिकडे बसणार आणि बिना आयुक्तचा ऑफीस इकडे राहणार? कोणाला फसवता? महाराष्ट्राची अवहेलना किती करणार?", असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.