Uddhav Thackeray Malegaon Sabha : लायकीपेक्षा जास्त मिळाल्याने त्यांना सत्तेची मस्ती चढली ; अद्वय हिरेंचा हल्लाबोल!

Uddhav Thackeray Malegaon Sabha
Uddhav Thackeray Malegaon Sabha

Uddhav Thackeray Malegaon Sabha : नाशिक जिल्ह्यात शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली सभा मालेगाव येथे होत आहे. या सभेत शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. अद्वय हिरे हे दिवंगत माजी मंत्री भाऊसाहेब हिरे यांचे वंशज आहेत. दादा भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे यांची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे आज मालेगाव येथे सभा घेत आहेत. 

अद्वय हिरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक दगडांना शेंदुर लावला, ते देव झाले. मात्र अचानक मिळालं, लायकीपेक्षा जास्त मिळालं म्हणून त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे.

आज महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांची गरज आहे, शिवसेनेची आहे. या सरकारकडून शेतकर्‍यांची दयनीय अवस्था होताना पहायला मिळत आहे. या शेतकर्‍याला वाचवायच असेल तर इथे बहुजनांच सरकार आणाव लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याशिवाय शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे अद्वय हिरे म्हणाले. 

Uddhav Thackeray Malegaon Sabha
Uddhav Thackeray : मालेगावातील सभेपूर्वी शिंदे गटाचे उत्तर सभेचे संकेत! दादा भुसे म्हणाले, जास्त बोलाल तर...

सुभाष देसाई यांची टीका -

शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, शिंदे गटाला मुंबई महापालिका जिंकायची आहे ते मुंबई केंद्रशासित करण्यासाठी आणि महाराष्ट्राला पुर लुटण्यासाठी. म्हणून मराठी माणुस, तो मुंबईचा असेल, विदर्भाचा असेल, मराठवाड्याचा असेल की उत्तर महाराष्ट्राचा.. त्याने जागरुक होऊन हे कारस्थान हाणून पाडलं पाहिजे.

जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की तरफ भागता है. असच काहीसं भाजपच होत आहे. महाराष्ट्रात असो, देशात असो, ज्या-ज्या कारवाया भारतीय जनता पक्ष करत आहे त्या त्यांच्यावरच उलटत आहेत, असे देखील सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray Malegaon Sabha
Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com