
UGC-NET Exam : युजीसी-नेट अर्जाची 31 पर्यंत मुदत
UGC-NET Exam : नॅशनल टेस्टींग एजन्सीतर्फे जूनमध्ये ८३ विषयांसाठी राष्ट्रीय स्तरावर युजीसी-नेट परीक्षा घेतली जाणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (UGC NET exam application deadline till 31st nashik news)
ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकपदासाठी युजीसी-नेट ही परीक्षा संगणकावर आधारित असेल. परीक्षेसाठी ऑनलाइन स्वरुपात अर्ज करण्याची मुदत ३१ मेपर्यंत आहे. १३ ते २२ जूनदरम्यान ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, परीक्षेसंदर्भात माहिती जारी करण्यात आली असली, तरी अधिकृत सूचनापत्राची प्रतीक्षा कायम होती. बुधवारी (ता. १०) सायंकाळी उशिरापर्यंत सूचनापत्र व नोंदणीची लिंक सक्रिय झालेली नव्हती
वेळापत्रक आले पूर्वपदावर
कोरोना महामारीमुळे विविध परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झालेले होते. संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याने विलंबाने परीक्षा होत होत्या. वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबरमध्ये या परीक्षा घेण्याचे नियोजित असताना प्रत्यक्षात वेळापत्रक पाळण्यात आलेले नव्हते.
२०२० आणि २०२१ वर्षांची युजीसी नेट एकत्रितरित्या घेण्यात आली. तर डिसेंबर २०२२ सत्रातील युजीसी नेट परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली. त्यानंतर आता जून सत्रातील परीक्षा मात्र निर्धारित वेळेत घेताना वेळापत्रक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे.