
Crosscountry Bicycle Ride : नाशिकच्या डॉ. मुस्तफांच्या नेतृत्वात दिल्ली ते काठमांडू राइड केली सर
नाशिक : देशातील पहिलीच दिल्ली ते काठमांडू क्रॉसकंट्री राइड भारतीय नऊ सायकलस्वारांनी यशस्वी पूर्ण करीत देशाच्या नावलौकिकात आणखी एक तुरा रोवला.
या सायकलस्वारांमध्ये नाशिकचे डॉ. मुस्तफा टोपीवाला आणि डॉ. राहुल पाटील या दोघांचा समावेश होता. या सायकल राइडचे नेतृत्त्वच नाशिकचे डॉ. मुस्तफा यांनी केले. (Nashik Under leadership of Dr Mustafa rode from Delhi to Kathmandu Crosscountry Bicycle Ride nashik news)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
नाशिकचे नामांकित फिजिओथेरपिस्ट डॉ. मुस्तफा टोपीवाला आणि डेन्टिस्ट डॉ. राहुल पाटील यांच्यासह देशभरातील नऊ सायकलिस्टने दिल्ली ते काठमांडू क्रॉसकंट्री सायकल राइड यशस्वीरीत्या पूर्ण केली. गेल्या सोमवारी (ता. २०) दिल्ली येथून पहाटे पाचला सायकलिस्ट काठमांडूच्या (नेपाळ) दिशेने सायकलीवरून निघाले.
भारतातून परदेशात अशारीतीने पहिल्यांदाच सायकलिंग करीत सायकलपटू गेले. सुमारे १२०० कि.मी. अंतरासाठी या सायकलिस्टला पाच दिवसांचा कालावधी लागला आहे. सीतारगंज, चिसापानी, लॅम्हाई, लुम्बानी, चिम्लीग्टर या शहरातून काठमांडूत सायकलिस्ट दाखल झाले.
दिल्लीकडून काठमांडूकडे जातानाचा मार्ग अत्यंत खडतर असून, आठ हजार मीटरचा पूर्ण चढ या सायकलिस्टने अत्यंत खडतर वातावरणात पार केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
नेपाळच्या उपसभापती इंद्राराणी मगर आणि भारतीय दूतावासातर्फे काठमांडू येथे सायकलस्वारांचे दोन्ही देशांच्या दूतावासातर्फे स्वागत करण्यात आले. या सायकलस्वारांमध्ये महाराष्ट्रातून नाशिकचे दोन, तर दिल्ली, पंजाब, गुजरातमधील सायकलिस्ट सहभागी झाले होते.