Nashik: प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू; रक्त कमी असल्याची माहिती | Unfortunate death of pregnant woman during treatment at primary health centre Information about blood loss Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd at medical centre

Nashik: प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू; रक्त कमी असल्याची माहिती

अंबासन, (जि.नाशिक) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान दुर्दवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला व जायखेडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले होते. (Unfortunate death of pregnant woman during treatment at primary health centre Information about blood loss Nashik news)

वैद्यकीय आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैशाली किशोर तोरे (वय १९) ही गर्भवती महिला सासू रेशमाबाई संतोष तोरे यांच्यासह अकरा वाजेच्या सुमारास उपचारासाठी आले होते.

त्यावेळेस सदर गर्भवती महिलेचा रक्त तपासणीचा रिपोर्ट वैद्यकीय आधिकाऱ्यांनी तपासला असता शरीरात ७.१ gms इतके अल्प रक्त असल्याचे दिसून आल्याने रक्त वाढीसाठी उपचार सुरू केले.

सलाईनव्दारे आयर्न सुक्रोस हे रक्तवाढीचे इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र काही वेळातच सदर महिलेला मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने दिलेली सलाईन बंद करण्यात आल्याचे स्थानिक वैद्यकीय आधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत उपचार सुरू केले मात्र संबंधित महिलेकडून उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अधिक उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यासाठी १०८ रूग्णवाहिका पाचारण केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र श्वास घेण्यासाठी अधिकच त्रास होऊ लागल्याने ब-याच वेळ कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला मात्र वैशालीकडून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने तीचे ह्रदयाचे ठोके बंद पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय आधिका-यांकडून सांगितले जात आहे.

याबाबत आदिवासी वस्तीत माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात गर्दी झाली होती व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांना माहिती दिली असता उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

नाशिक येथील शासकीय रुग्णालयात मयत वैशाली तोरे यांचे इनकॅमेरा शवविच्छेदन केले जाणार असून फाॅरेन्सिक लॅबमधून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे.

"शरीरात रक्त कमी असल्या कारणामुळे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सदर गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी आली असता वैद्यकीय आधिका-यांनी रक्त वाढीसाठी आवश्यक असलेले औषधोपचार करीत असतानाच महिलेचा मृत्यू झाला. तरी या बाबतची सखोल चौकशी करत आहोत व ज्या बॅचचे इंजेक्शन वापरले होते त्या बॅचचे उर्वरित इंजेक्शन लॅब टेस्टिंगसाठी जिल्हा स्तरावर पाठवत आहे." - हर्षलकुमार महाजन, तालुका वैद्यकीय आधिकारी.

टॅग्स :Nashikdeath