
Dr. Bharati Pawar : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचा बैठकीतूनच जिल्हाधिकाऱ्यांना फोन!
Dr. Bharati Pawar : पाणी टंचाईची दाहकता भयावह आहे. रोहित्रासाठी पैशांची मागणी होते. रेशनकार्ड मिळत नाही अन् ज्यांना मिळाले त्यांना अजून धान्य मिळत नाही. शेती नुकसानीचे पंचमाने होऊनही भरपाई मिळत नाही.
अशा अनेक तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या आढावा बैठकीत झाल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. पवार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून महसूल विभागाच्या तक्रारीचे गाऱ्हाणे मांडत याप्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली. (Union Minister of State Dr Pawar called District Collector from meeting for public problems at yeola nashik news)
डॉ. पवार यांनी भारम येथे जनता दरबारात नागरिकांशी संवाद साधला. प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, गटविकास अधिकारी अन्सार शेख, पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर,
पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, तालुका कृषी अधिकारी महेश जंगम, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता जी. बी. राहटळ, आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे, स्थानक प्रमुख विकास व्हाहुळ, राज्य उत्पादन निरीक्षक विठ्ठल चौरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा कृपास्वामी आदींसह नागरीक या वेळी उपस्थित होते.
अनेक नागरिकांनी या वेळी समस्या मांडल्या. विविध विभागांशी संबंधीत तक्रारींचा सविस्तर आढावा घेऊन या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेत, निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान, राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होणार असली, तरी पुरेसे टँकर सुरू ठेवण्याचे निर्देश मंत्री पवार यांनी दिले. मागील वर्षीच्या नुकसान भरपाईचा आढावा घेताना प्रशासनाच्या अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने, यापुढे जबाबदारी व्यवस्थित सांभाळा अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
तसेच, ग्रामसेवकांचे प्रशिक्षण वर्ग घेऊन सर्व ग्रामसेवक प्रशिक्षित करण्यास सांगितले. भाजपाचे आनंद शिंदे, राजुसिंग परदेशी, समीर समदडीया, सुनील सोमासे, नंदकुमार शिंदे, नानासाहेब लहरे, दत्ता सानप, गणेश गायकवाड, संतोष काटे, संतोष केंद्रे,
कृष्णा कव्हात, योगेश व्यवहारे, संदीप मुरकुटे, बाळासाहेब सातारकर, छगन दिवटे, दत्तू सोमासे, सखाहरी लासुरे, अशोक देवरे, पद्माकर देशमुख, गौतम पगारे, प्रमोद बोडके, वाल्मीक सोमासे, गोरखनाथ खैरनार, संजय पगारे, राजेंद्र मगर, हरिभाऊ पुणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.