Unseasonal Rain : बागलाण तालुक्यात अवकाळीचा पुन्हा धुडगूस; ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित | Unseasonal rain again in Baglan taluka Life disrupted by torrential rains nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Due to unseasonal rains, rainwater accumulated in Sahadu Salve's farm

Unseasonal Rain : बागलाण तालुक्यात अवकाळीचा पुन्हा धुडगूस; ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित

Unseasonal Rain : बागलाण तालुक्यात रविवारी (ता.३०) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत धुडगूस घातला. तालुक्यातील ताहाराबाद (ता. बागलाण) गटात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेती पिकांसह इतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळित झाले आहे. (Unseasonal rain again in Baglan taluka Life disrupted by torrential rains nashik news)

मागील महिन्याभरापासून बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. यामुळे येथील सर्व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी तालुक्यातील पिंपळकोठे, दसवेल, राजापूर ,कातरवेल,

ताहाराबाद, सोमपूर, भडाने, अंतापूर, मुल्हेर या भागात पाच ते सहा वेळेस नुकसानग्रस्त गारांसह वाऱ्याचा पाऊस झाल्याने काढलेला व काढावयाच्या कांदा पिकासह डाळिंब, गहू, टोमॅटो, मिरची इतर पालेभाज्या या पिकांचे नुकसान झाले आहे.

यातच शेतात काढलेल्या कांदा घोड्या घालून ठेवला असता ढगफुटी सारख्या पाऊस झाल्याने लाखो रुपये खर्च करून काबाडकष्टने पिकविलेला हजारो क्विंटल कांदा शेतात इतरत्र वाहून गेला. डाळिंब, आंबा बहार असलेले व इतर झाडे उन्मळून पडले.

सर्वत्र आभाळ फाटल्याने बळिराजाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बागलाण तालुक्यात अशा पद्धतीचे अनेक नुकसानीचे बेमोसमी पाऊस झाले असून लोकप्रतिनिधींनी पाहणी करून संबंधितांनी पंचनामे ही केले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

परंतु नुकसानीची भरपाई न मिळाल्याने आता ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न बळिराजापुढे निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात अशा पध्दतीचा इतका बेमोसमी नुकसानी वादळी गारांचा पाऊसाचा अनुभव बागलाण तालुका अनुभवत आहे .

विवाहस्थळी महिला जखमी

ताहाराबाद येथे रविवारचा आठवडे बाजार होता. याच दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारांचा पाऊस झाल्याने लहान मोठ्या अनेक दुकानदारांचे नुकसान झाले आहे. दसवेल (ता.बागलाण) येथे प्राथमिक शाळेत विवाह होता.

विवाह दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मंडप, अन्नपदार्थ, वर्ग इमारत नुकसान झाले तर वराडी महिलेच्या पायावर लोखंडी पाइप पडल्याने जखमी झाली आहे.