
Unseasonal Rain Crop Damage : कांदा भिजला तर बेदाणा फेकण्याची वेळ
Unseasonal Rain Crop Damage : कांदानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसराला दुपारी तीनच्या दरम्यान दहा ते १५ मिनिटे झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजला आहे. निफाड तालुक्यात द्राक्ष उत्पादक मोठ्या संख्येने असल्याने अनेक शेतकरी व व्यापारी उघड्यावर बेदाणा तयार करतात.
या बेदाणा उत्पादकांना देखील या अवकाळीचा तडाखा बसला आहे. तयार झालेले बेदाणे हे फेकून देण्याची वेळ बेदाणे उत्पादकांवर आली आहे. (Unseasonal Rain Crop Damage onion raisins crop danger nashik news)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
गेल्या काही आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल जमीनदोस्त झाला आहे. अनेक बागांमधील द्राक्ष सडल्याने द्राक्ष काढून फेकण्यासाठीही पैसा शिल्लक नाही. बँकेचे घेतलेले कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, पुढील पीक कसे घ्यावे यासह अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहे.
"दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाबरोबर गारपीट झाली. शेतात काढणीस आलेले कांदे, मका, भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ कांदे भिजल्याने ते आता साठवणूक करता येणार नाहीत, पुढील वर्षांसाठी उन्हाळ कांदा बीज उत्पादनांसाठी लावलेले डोंगळे हवा व गारांसह जमीनदोस्त झाले आहेत."
- सुनील गवळी, शेतकरी, ब्राम्हणगाव-विंचूर