Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कावळेही संभ्रमात; विशिष्ट बदलांमुळे पावसाचा अंदाज | Unseasonal Rain Even crows confused due to unseasonal rain Prediction of rainfall due to specific changes nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crow nest file photo

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कावळेही संभ्रमात; विशिष्ट बदलांमुळे पावसाचा अंदाज

Unseasonal Rain : राज्यात गेल्या वर्षी पावसाने कहर केला होता. पावसामुळे व अवकाळी पावसामुळे खरीप- रब्बी पिकांचे नुकसान झाले. एप्रिल, मे मध्येही पाऊस पडत आहे. मृग नक्षत्रापूर्वी कावळ्यांनी गावातील वेगवेगळ्या झाडांवर पालवी फुटण्याच्या आधी आपले घरटे बांधण्यास सुरवात केली होती.

त्यांची घरटी झाडाच्या मध्यभागी दिसून येत असल्यामुळे यंदाही ९५ ते १०० टक्के दमदार पाऊस होण्याची शक्यता जाणकार शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. (Unseasonal Rain Even crows confused due to unseasonal rain Prediction of rainfall due to specific changes nashik news)

क्वचित ठिकाणी एखादे घरटे शेंड्यावर दिसल्याने कावळे सुद्धा घरटे बांधताना संभ्रमात पडलेले असावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पशूपक्षी, कीटक यांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज वर्तविला जातो. संगणकीय युग असले तरी आत्तापासूनच पशूपक्ष्यांकडून पूर्वसूचना देणे सुरू झाले आहे.

सध्या टॅक्नोलॉजीचे युग आहे. शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज देण्यासाठी वर्तमानपत्र, मोबाईल, वेधशाळा, ज्योतिष, पंचांग हे आहेत. गावामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धती सुद्धा आहेत.

त्या सर्वांचा उपयोग करून शेतकरी पावसाचा अंदाज बांधतो. सगळ्यात सोपे म्हणजे ग्रामीण भागात कावळ्याचे घरटे हे पावसाचा अंदाज सांगतो. त्याला सर्व शेतकऱ्यांची मान्यताही असते. हा अंदाज पूर्वापार चालत आलेला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मागील वर्षी व यंदा कावळ्यांची घरटी पाहून शेतकरी उत्साही आहे. यंदाही निंबाच्या झाडाला निंबोळ्यांचा घोस लागला आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे. कावळ्याप्रमाणे वृक्ष, टिटवी, पाणपेगु,

निळ्या कामाचा खंड्या, मुंग्या, सरडे, किटक तसेच, पक्ष्यांच्या पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या विशिष्ट बदलांमुळे पावसाचा अंदाज बांधण्याचे कौशल्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी परंपरेने आत्मसात केलेले आहे. मात्र कावळ्याची घरटी, काटेरी वृक्षांच्या शेंड्यावर बांधलेली असल्यास त्या वर्षी दुष्काळ पडतो.