Unseasonal Rain Damage : अवकाळी पावसाने इगतपुरीमध्ये वीट व्यावसायिकांना मोठा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unseasonal Rain Damage

Unseasonal Rain Damage : अवकाळी पावसाने इगतपुरीमध्ये वीट व्यावसायिकांना मोठा फटका

सर्वतीर्थ टाकेद : बांधकाम क्षेत्राचा कणा असलेल्या वीटभट्टी व्यवसायालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे भट्टीवरील कच्च्या विटा भिजल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा वीटभट्टी व्यवसाय सर्वत्र तेजीत असून, विटांची मागणीदेखील वाढली आहे. विटेचा सध्या जागेवर प्रतिन नग दर ७ रुपये, तर जागेवर पोच ७.५० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घरघर लागलेल्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे टाकेद-धामणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कच्च्या विटांचा चिखल झाला आहे.

विशेष म्हणजे अचानक मध्यरात्री झालेल्या पावसामुळे विटांचे संरक्षण करण्यासही अवधी मिळाला नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊन व्यावसायिक संकटात सापडले आहेत. दरम्यान तेजीत आलेल्या व्यवसायाला अचानक अवकाळी पावसाचा फटका बसला असून आर्थिक नुकसान झाल्याचे वीट उत्पादक मंगेश गाढवे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikrain