
Nashik Rain: होळीच्या उत्साहावर अवकाळीचे विरजण; अस्मानी संकटाने बळीराजा हळहळला
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात सोमवारी (ता. 6) मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरु झाली. ऐन होळीच्या सणादरम्यान या अवकाळीला सुरुवात झाल्याने जिल्हाभरात होळीच्या सणावर विरजण आले. यासह आधिच कोसळलेल्या बाजार भावामुळे हवालदिल झालेल्या बळीराजावर अस्मानी संकट कोसळले.
(Unseasonal rain in nashik district harm to agriculture crops destroy holi dahan festival)
जिल्ह्यात आज (ता. 6) सायंकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यात वाऱ्याचा वेग अधिक तर विजांचा कडकडाटही मोठ्याप्रमाणावर होता. या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला गहू, द्राक्ष यासह पिकांना मोठा फटका बसला आहे.
घरात गोडधोड करुन सण साजरा करण्याच्या अपेक्षेवर अवकाळी पावसाने पाणी फेरलेच मात्र यात बळीराजाला मोठी हानी सहन आर्थिक अन् मानसिक हानी सहन करावी लागत आहे. शासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.