Nashik Rain: अवकाळी पावसाने द्राक्ष नगरी हळहळली; बळीराजाच्या हातच्या पिकांवर पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unseasonal rain in nashik district harm to agriculture crops

Nashik Rain: अवकाळी पावसाने द्राक्ष नगरी हळहळली; बळीराजाच्या हातच्या पिकांवर पाणी

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Unseasonal rain in nashik district harm to agriculture crops)

सोमावरी मध्यपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. द्राक्ष, कांदा, गहू आदी पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे.

शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकरी राजाला न्याय द्यावा अशी मागणी अनेक भागातून होत आहे.सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सोमवारी पहाटे सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. द्राक्ष कांदा गहू आदी पिकांवर नुकसान होण्याचे शेतकरी वर्गातून वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

अतिशय दुःखदायक व आसमानी संकटामुळे शेतकरी राजा परत एकदा मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा पिकांना भाव नाही मागील काही महिन्यांपासून अवकाळी पावसाने हाती आलेल्या पिकांचा घास हिरावून नेल्याने शेतकरी मागील वर्षापासूनच अनेक संकटांना तोंड देत आहे.

त्यातच सणाच्या वेळी अस्मानी संकटाने पावसाने सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकरी राजा संकटात सापडलेला आहे.

सिन्नरला पूर्व भागात सिन्नर ते खोपडी दरम्यान पाऊस, काही ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहायला सुरुवात झाली होती. चांदोरी सह परिसरात विजांच्या गडगडाटासह दोन तासाहून अधिक काळ पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . निफाडच्या द्राक्ष पंढरीला अवकाळीचा दणका बसला आहे.

टॅग्स :NashikrainCrops Damage