Unseasonal Rain : टेहेरेत कांदा पिकाचे नुकसान; शेतकरी हैराण | unseasonal rain Loss of onion crop in Tehare nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unseasonal Rain

Unseasonal Rain : टेहेरेत कांदा पिकाचे नुकसान; शेतकरी हैराण

Nashik News : कसमादे परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी (ता.६) देखील अवकाळी पावसाने टेहेरे परिसरात एक तास हजेरी लावली. यामुळे यामध्ये कांदा, डाळिंब, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (unseasonal rain Loss of onion crop in Tehare nashik news)

गेल्या आठवड्यापासून परिसरात अवकाळी पाऊस पडत आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा पिकांचे उत्पादन घेत असतात. परंतु यावर्षी उन्हाळ्यात देखील पाऊस पडत आहे. यामुळे आधीच शेतकऱ्याच्या कांदा पिकाला भाव नाही त्यातच अवकाळी पावसामुळे नुकसान झाले यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कांदा पिकाचे बाजार भाव बघता उत्पादन खर्च निघणे देखील कठीण आहे. प्रतिकिलो सरासरी ३ ते ४ रुपये दर मिळत आहे. यात वर्षभराचा लागवडीपासून, निंदणी, फवारणी, कांदा चाळीत साठवणूक व विक्री पर्यंतचा खर्चाचा हिशोब केला असता बळिराजाच्या हातात काहीच उरत नाही. अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.