Sun, June 4, 2023

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने झोडपले; रब्बीं पिकांचे मोठे नुकसान!
Published on : 7 March 2023, 5:18 am
नाशिक : निफाड तालुक्यात रात्रभर पाऊस बरसला. 25000 हेक्टर अधिक द्राक्ष पिकांना झळ बसणार आहे. आज दुसऱ्या दिवशी द्राक्ष पंढरीतील द्राक्षांचे (Grapes) हार्वेस्टिंग थांबलेले आहे. (unseasonal rain Rabi crops including wheat grapes vegetables were extensively damaged nashik news)
गहू, द्राक्ष, भाजीपाल्यासह रब्बीं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिन्नर तालुक्यातही रात्रभर पाऊस सुरू होता.
पावसाचा जोर आणि वादळ अधिक असल्याने गहू,मका, ही पिके शेतात आडवी झाली असून कांदा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....