Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा दाणादाण; सिन्नर, निफाड, लासलगावातील गावांना मोठा फटका | Unseasonal rains again Villages of Sinnar Niphad Lasalgaon have been hit hard nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A farmer's onion shed collapsed in the storm

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा दाणादाण; सिन्नर, निफाड, लासलगावातील गावांना मोठा फटका

Unseasonal Rain : गत काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही गावांत दाणादाण उडवली आहे. शुक्रवारी (ता. २८) पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावत शेती पिकांचे मोठे नुकसान करत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पुन्हा हिरावले आहे. (Unseasonal rains again Villages of Sinnar Niphad Lasalgaon have been hit hard nashik news)

निफाड तालुक्यात नुकसान

निफाड : गत काही दिवसांपासून निफाड तालुक्यात अवकाळी द्राक्ष पंढरीची वाट सोडायला तयार नाही. यामुळे द्राक्षांचे इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच लासलगाव विंचूर, निफाड अन्य भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टाकळी, विंचूरला कांद्याचे शेड जमीनदोस्त

लासलगाव : टाकळी विंचूर येथील कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रय दादासाहेब पवार यांनी स्वतःच्या शेतात तीन वर्षांपूर्वी १२०×८० या आकाराचे कांदे साठवण्यासाठी चार लाख रुपये कर्ज काढून शेड उभे केले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे ते शेड जमीनदोस्त झाले. त्या शेडमध्ये ५०० क्विंटल उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले होते ते सर्व कांदे साठवून करून शेडमध्ये ठेवलेले होते. शेड मध्ये लावलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर शेड पडल्यामुळे थोड्या प्रमाणात कांदे वाचले. परंतु, ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीबाबत शिवसेना तालुका समन्वयक केशवराव जाधव यांनी तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांना माहिती दिली. त्यांनी शेतामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. पवार कुटुंबीयांना धीर दिला.