Unseasonal Rain : येवल्यास तालुक्याला अवकाळीने झोडपले; शेतकऱ्यांची धावपळ | Unseasonal rains hit yeola taluka nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water accumulated in fields due to unseasonal rains

Unseasonal Rain : येवल्यास तालुक्याला अवकाळीने झोडपले; शेतकऱ्यांची धावपळ

Unseasonal Rain : येवला शहर व तालुक्यात गुरुवारी (ता.४) सायंकाळी सुमारे तासभर अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून शेतातील उन्हाळ कांद्यासह भाजीपाला व इतर पिकांना मोठा फटका बसणार आहे. (Unseasonal rains hit yeola taluka nashik news)

हवामान विभागाने पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असल्याने सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आज झालेल्या पावसामुळे शहर व परिसरातील शेतीला देखील फटका बसला आहे.

तालुक्यातील पाटोदा, कातरणी, विखरणी आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या गहू, कांदा पिकांचे नुकसान झाले. अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अनेक भागात कांद्याची काढणी सुरु आहे.

खांडून ठेवलेला कांदा वावरत असताना शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पावसात कांदे भिजल्याने मोठे नुकसान झाले. शेतकरी गहू, हरभरा हे सोंगणीला आलेले पीक झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

येवला परिसरात गुरुवारी (ता.४) सायंकाळी पाचनंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बाजारातील व्यावसायिकांसह नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे पाहायला मिळाली.

प्रचंड उकाडा व नंतर काळे ढग भरून आल्याने दुपारनंतर पावसाने सुमारे एक तास हजेरी लावल्याने छोटे-मोठे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला होता.