Unseasonal Rain : सिन्नर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने घातला धुडगूस | Unseasonal rains wreaked havoc in Sinnar taluka with lightning nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unseasonal Rain

Unseasonal Rain : सिन्नर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने घातला धुडगूस

Unseasonal Rain : सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दुपारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी भागात वीज पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर आज सलग दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने शहरात हजेरी लावली आहे. (Unseasonal rains wreaked havoc in Sinnar taluka with lightning nashik news)

या अवकाळी  पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून उन्हाळ कांदा, गहू,कांदा बियाणे (डोंगळे), हरभरा, पिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

यामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांना मोठा फटका बसला असून ही द्राक्ष आता कवडीमोल दराने विकावी लागणार असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरू आहे.

मात्र, काढलेला कांदा हा शेतातच भिजल्यामुळे कांदा पिकालाही फटका बसला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शुक्रवारी सिन्नर बाजार समितीची निवडणूक असल्याने मतदान करण्यासाठी अनेक मतदार घराबाहेर पडलेले असताना मतदान केंद्राबाहेर पावसाने सुरुवात केल्याने अनेकांची धावपळ उडाली तसेच अतिशय जोरदार पाऊस पडल्याने सर्वीकडे पाणीच पाणी होते.

त्यात बळीराजावर या अवकाळी पावसाने खूप मोठे संकट ओढावले असून सगळीकडे पाणीच पाणी वाहत होते हे आसमानी संकट कधी दूर होईल या चिंतेत सर्व नागरिक व बळीराजा आहेत