शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त 77 बैलगाडी मिरवणूकद्वारे मांडव टाकण्यास सुरवात! | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kautik Pagar, Sunita Pagar, Jayashree Pawar etc. on the occasion of Mandav program on the occasion of unveiling the statue of Chhatrapati Shivaraya on Shivtirtha Puja of Shankarao Nikam's bullock cart.

Nashik News: शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त 77 बैलगाडी मिरवणूकद्वारे मांडव टाकण्यास सुरवात!

कळवण (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्ताने कळवणला रविवारी (ता. ५) ७७ बैलगाडी मिरवणुकद्वारे मांडव टाकण्यास सुरवात करण्यात आली.

या निमित्ताने पुढील पाच दिवस कळवणला विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवस्मारक समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी हजारो शिवभक्त बैलगाडी मिरवणूक कार्यक्रमास सहभागी झाले होते. (unveiling ceremony of chhatrapati shivaji maharaj statue 77 bullock carts for Mandav Various events from today 5 days Nashik News)

शनिवारी श्री विठ्ठल मंदिरात मांडव बेत (पानसुपारी) कार्यक्रमाचे आयोजन शिवस्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी समिती अध्यक्ष भूषण पगार यांनी विविध कार्यक्रमाची माहिती देऊन तालुक्यातील शिवप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

रविवारी (ता.५) सकाळी तालुक्यातील ७७ बैलगाडीची मांडव मिरवणूक फुलाबाई चौकातून सुभाषपेठ, गांधी चौक मार्ग भाजी मंडईतून गणेशनगर, एसटी बस स्थानकमार्ग मेनरोडने शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली.

बैलगाड्याचे पूजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार, उपनगराध्यक्षा लता निकम, सोनाली देवरे, सुनीता निकम, वर्षा शिंदे यांच्यासह ७७ महिलांनी केले. शिवतीर्थावर कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी सपत्नीक विधीवत मांडव पूजन केल्यानंतर मांडव टाकण्यात आला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यावेळी हजारो शिवप्रेमीच्या साक्षीने सामूहिक शिवछत्रपतीची महाआरती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश मालपूरे, राकेश हिरे यांनी केले.

पुतळा अनावरणानिमित्त 8 मार्च पर्यंत गांधी चौकात रात्री आठ ते दहा वेळेत रोहिदास महाराज हांडे यांचा शिवचरित्र संगीत कथा कार्यक्रम, ६ ते ८ मार्च २०२३ दरम्यान ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराने शिवशक्ती याग, १० मार्च रोजी दुपारी २ ला शिवशाहीर कार्यक्रम, दुपारी ४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान्यवरांच्या हस्ते पुतळा अनावरण, सायंकाळी सहाला लेझर लाइट आणि फायर शो होणार असल्याची माहिती भूषण पगार यांनी दिली.