esakal | तब्बल 3 दिवसांनंतर प्राप्त कोरोना लशीचे डोस; दुसऱ्या डोस ‘प्रोटोकॉल’चा प्रश्‍न

बोलून बातमी शोधा

vaccine
तब्बल 3 दिवसांनंतर प्राप्त कोरोना लशीचे डोस; दुसऱ्या डोस ‘प्रोटोकॉल’चा प्रश्‍न
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : पुण्याहून आरोग्य यंत्रणेकडून उपलब्ध होणारी कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) गेले तीन दिवस नाशिक विभागासाठी (nashik) उपलब्ध झाली नाही. मंगळवारी अखेर सीरम इन्स्टिट्यूटच्या (serum institute) कोव्हिशील्डचे (covishield) एक लाख ५९ हजार, तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे ६८ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. ही लस उपलब्ध झाल्याने चार दिवसांपासून बंद पडलेले लसीकरण बुधवार (ता. ५)पासून सुरू होण्यास मदत होणार आहे. (vaccine dose received after three days)

ज्येष्ठांच्या कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोस ‘प्रोटोकॉल’चा प्रश्‍न

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होत राज्यभरात अनेक ज्येष्ठांनी कोव्हॅक्सिन लस घेण्यास पसंती दिली. पण त्यातील बऱ्याच ज्येष्ठांना २८ दिवसांपासून ४० दिवस उलटून गेले, तरीही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे लसीकरणाच्या ‘प्रोटोकॉल’चा गंभीर प्रश्‍न राज्यातील अनेक ठिकाणी तयार झाला आहे. यासंबंधाने आरोग्य यंत्रणेतील राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, ‘प्रोटोकॉल’ पाळण्याविषयीचे कुठलेही उत्तर मिळाले नाही. उलटपक्षी लस उपलब्ध होईल, तसा दुसरा डोस ज्येष्ठ घेऊ शकतात, असे सांगण्यात आले.

हेही वाचा: महाराष्ट्र - गुजरात सीमेवर पोलिस सतर्क; ई-पास असणाऱ्यांनाच प्रवेश

डोस अखेर तीन दिवसांच्या खंडानंतर झाले प्राप्त

दरम्यान, नाशिक विभागासाठी पुण्याहून ३० एप्रिलला ४२ हजार ५०० डोस मिळाले होते. त्याचे दुसऱ्या दिवशी वितरण करण्यात आले होते. पण अनेक लसीकरण केंद्रांवर रांगा लागलेल्या असताना त्या तुलनेत लस मिळत नसल्याने अनेकांना घरी परत जावे लागले. आताही लस उपलब्धतेची माहिती एव्हाना विशेषतः तरुणाईपर्यंत पोचली असल्याने बुधवारी (ता. ५) सकाळपासून लसीकरण केंद्रांवर रांगा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी गर्दीत शारीरिक अंतर पाळले जाण्याची खबरदारी घेतली गेली नाही, तर कोरोनाला रोखण्याऐवजी त्याच्या प्रसाराला निमंत्रण मिळणार आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!