Vani Police caught the accused along with the suspect while illegally transporting liquor without license
Vani Police caught the accused along with the suspect while illegally transporting liquor without licenseesakal

Nashik Crime : वणी पोलिसांनी 84 हजारांचे मद्य पकडले

Nashik Crime : दिंडोरी तालुक्यातील करंजखेड ते चारणवाडी या रस्त्यावर चारणवाडी शिवारात ८४ हजाराचे मद्य, वाहनासह जप्त करण्यात आले आहे.

वणी पोलिस ठाण्याचे सुरेश चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार करंजखेड ते चारणवाडी दरम्यान अवैधरीत्या दारू विक्रीसाठी चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. (Vani police seized liquor worth 84 thousand Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vani Police caught the accused along with the suspect while illegally transporting liquor without license
Shrirampur Crime : बायकोबद्दल वाईटसाईट बोलल्याच्या रागातून चॉपरने वार करून तरुणाची हत्या

गुरुवारी (ता. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास वणी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी किरण गांगुर्डे, अण्णा जाधव, कुणाल मराठे, संजय दळवी, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने चारणवाडी शिवारात पिकअप (एमएच १५, बीडी ५४९१) पकडली. ८४ हजाराच्या मद्यासह तीन लाख किमतीचे पिकअप असा एकूण ३ लाख ८४ हजाराचा मुद्देमाल मिळून आला.

सुरेश वामन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब रामभाऊ जाधव (रा. मोहमुख, ता. कळवण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vani Police caught the accused along with the suspect while illegally transporting liquor without license
Ration Scam Crime : शासकीय धान्याचा काळाबाजार; रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com