

नाशिक: लोकसभा निवडणुकीचा आज पाचवा टप्पा पार पडला. या लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेकदा आरोप प्रत्यारोपाच्या चर्चा रंगल्या. मात्र, आज निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीतर्फे सर्वत्र पैसे वाटप होत असल्याच्या चर्चा दिवसभर नाशिकच्या इंदिरानगर भागात सुरू होत्या.
महायुतीतर्फे सर्वत्र पैसे वाटप होत असल्याच्या चर्चा दिवसभर इंदिरानगर भागात सुरू होत्या. त्यामुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. दुपारच्या सुमारास इंदिरानगर येथील भाजप च्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैसे वाटप होत असल्याची माहिती भरारी पथक आणि पोलिसांना देण्यात आली. या ठिकाणी शिवाजी वाडी ,भारत नगर ,अण्णाभाऊ साठे नगर, सावित्रीबाई फुले वसाहत, वडाळा घरकुल आदी भागातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते ऋषिकेश वर्मा आणि आकाश खोडे यांनी येथील चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येथे धाड टाकून चौकशी केली. तेथे असलेल्या या नगरसेविकेच्या पतीने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले. पथकाने कसून तपासणी केली.
मात्र, काही न मिळाल्याने येथे मतदारांना स्लीप वाटण्याचे काम सुरू होते असा निष्कर्ष त्यांनी काढला. असे असले तरी मतदान संपेपर्यंत सर्वच भागात सर्रास पैसे वाटले जात आहेत अशी चर्चा मतदारात होती .मतदारांनी पैसे देखील घेतले. मात्र, जे करायचे ते बरोबर केले आहे असा दावा दोन्ही बाजूच्या उमेदवारांच्या समर्थकांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.