Girish Mahajan : आगामी सर्वच निवडणुका गिरिशभाऊच्या नेतृत्वाखालीच : विजय चौधरी | Vijay Chaudhary statement All upcoming elections under leadership of Girish mahajan nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan

Girish Mahajan : आगामी सर्वच निवडणुका गिरिशभाऊच्या नेतृत्वाखालीच : विजय चौधरी

Girish Mahajan : भारतीय जनता पक्षाचे नेते, संकटमोचक असलेले गिरीश महाजन हे माझे नेते असून तेच पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील नेते आहेत. आगामी सर्व निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे पक्षाचे महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी सांगितले. (Vijay Chaudhary statement All upcoming elections under leadership of Girish mahajan nashik news)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार कार्यपद्धतीचा भाग म्हणून व सरकारच्या योजना बूथ स्थरावर नेऊन संघटना बळकट व्हावी, यासाठी पाच महामंत्र्यांना, सोळा उपाध्यक्ष व, सोळा सचिव यांनाही, जबाबदारी दिली आहे.

महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव यांची त्या त्या महसूल विभागनिहाय याविषयीची सूची नुकतीच जाहीर केली आहे, त्यात उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून श्री.चौधरी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबतच्या वृत्तात गिरिशभाऊंना धक्का असे म्हटल्याने आपण व्यथित झालो आहोत, असे सांगून श्री. चौधरी पुढे म्हणाले त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, त्यांच्या विषयी माझ्या मनात आदर आहे, तेच आमचे नेते आणि पक्षाचे संकटमोचक आहेत.

उत्तर महाराष्ट्रतील आगामी महापालिका, जिल्हा परिषदसह सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :girish mahajan