ग्रामरोजगार सेवकांना 4 महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा

payment
paymentesakal

सिन्नर (जि. नाशिक) : रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम स्तरावर कार्यरत असलेल्या सिन्नरमधील ग्रामरोजगार सेवकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून मानधन वर्ग होऊन दोन आठवडे उलटले.

मात्र, पंचायत समितीत मानधनाच्या धनादेशावर स्वाक्षरी कोणी करायची असा प्रश्न उपस्थित करत गाऱ्हाणे मांडण्यासाठी गेलेल्या ग्रामरोजगार सेवकांच्या शिष्टमंडळाला सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचा प्रकार घडला आहे. (Village employment servants waiting for salary payments since 4 months nashik Latest Marathi News)

गावातील अकुशल मजुरांना, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना चालना देऊन रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामरोजगार सेवक पुढाकार घेत आहेत. इतरांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या ग्रामरोजगार सेवकांचे गेल्या चार महिन्यांचे मानधन सिन्नर पंचायत समितीकडे जमा असून ते मिळावे म्हणून कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पंचायत समीतीमधील रोहयो विभागातील वित्त विभागाला कर्मचारी नसल्याने ग्रामरोजगार सेवकांचे मानधनाची लिस्ट तयार होऊन दोन आठवडे झालेत. मात्र चेकवर सही करणार कोण असे सांगत सहायक गटविकास अधिकारी सुखदेव चित्ते यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामरोजगार सेवकांची बोळवणी केली असल्याचा आरोप ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हा सचिव अनिल बुचकुल यांनी केला आहे.

payment
काही लोक काळ्या जादुचा अवलंब करतायत; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

ग्रामरोजगार सेवक संघटनेने गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना वेळोवेळी निवेदने देऊन ही कुठली ही सुधारणा होत नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी वारंवार सांगूनहीत्यांना रोहयो विभागातील कर्मचारी जुमानत नसल्याचे बुचकूल यांनी सांगितले.

रोहयोच्या वित्त विभागात काम करणारा लाड नामक कर्मचारी आपण या विभागाचे कामच करत नसल्याचे सांगतो. त्यामुळे येथे नियुक्ती कोणाची असा प्रश्न आहे. वित्त विभागात अधिकृत कारकून नेमलेला नसेल तर पंचायत समितीत होणाऱ्या दैनंदिन खर्चाला कोण जबाबदार आहे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

"ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न येत्या दोन दिवसात मार्गी लागेल. या संदर्भात संबंधित विभागाला आपण सूचना केलेल्या आहेत. ग्रामरोजगार सेवकांना त्रास देण्याचा प्रशासनाचा कोणताही हेतू नाही. ग्रामरोजगार सेवकांकडून उपस्थित झालेल्या तक्रारीबाबत चौकशी करण्यात येईल." - मधुकर मुरकुटे, गट विकास अधिकारी सिन्नर

payment
२२ वर्षीय युवकाची अनोळखी युवकांकडुन हत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com