Nashik Accident News: वणी- नाशिक रस्त्यावर दुचाकी घसरल्याने अपघात; 2 ठार, एक जखमी | Wani Nashik road accident due to two wheeler falling 2 killed one injured news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Accident News

Nashik Accident News: वणी- नाशिक रस्त्यावर दुचाकी घसरल्याने अपघात; 2 ठार, एक जखमी

Nashik Accident News : वणी - नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणा लगतच्या उताराला दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दोन युवकांना आपला प्राण गमवावा लागला तर एक जण गंभीर जखमी असल्याने पुढील उपाचाराठी त्याला जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

यात भारत किसन चौधरी वय - ३२ राहणार कोल्हेर, मयुर चिंतामण भोये, वय १८ राहणार कोल्हेर हे अपघातात मयत झाले असून विकी भरत धुम वय २५ - हा गंभीर जखमी आहे. (Wani Nashik road accident due to two wheeler falling 2 killed one injured news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत सविस्तर वृत्त असे की अपघातातील मयत व जखमी हे मोटर सायकल एम एच १५ सी एन ४४७८ वर वणी हून दिंडोरी कडे जात असताना ओझरखेड नर्सरी जवळील उताराला दुचाकी घसरून होऊन अपघात झाला.

यात तिघांना डोक्याला व छातीला जबर मार लागला असल्याने १०८ रुग्ण वाहिकेने स्थानिक नागरिक यांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तिघांपैकी भारत व मयुर यांना तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले.

तर तिसरा युवक विकी धुम यांस डोक्याला जबर मार लागला असल्याने त्यास नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटना स्थळी व रुग्णालयात वणी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.पुढील तपास सहाय्यक पोलिल निरीक्षक निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनखाली पो. काँ.सोनवणे करत आहे.

टॅग्स :Accident Death News