Water Cut : मालेगावात शनिवारी पाणीपुरवठा बंद | Water supply cut in Malegaon on Saturday nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply to be cut

Water Cut : मालेगावात शनिवारी पाणीपुरवठा बंद

Water Cut : वीज वितरण कंपनीकडून १३ मेस येथील सायने सबस्टेशनवरील एक्स्प्रेस फीडरवर तांत्रिक कामे केली जाणार आहेत. यासाठी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. परिणामी मालेगाव शहरात शनिवारी (ता. १३) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरावे, महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले आहे. (Water supply cut in Malegaon on Saturday nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सायने फिडरवरील तांत्रिक काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे वीज कंपनीने महापालिका प्रशासनाला कळविले आहे. या कामामुळे वीज पुरवठा मोठ्या कालावधीसाठी खंडित केला जाणार आहे.

गिरणा पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. १३ मेस सर्वत्र पाणी पुरवठा करणे अशक्य होणार आहे. या दिवशी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

दुरुस्तीच्या कामानंतर शहरात एकदिवसाआड नियमित पाणीपुरवठा केला जाईल. १३ मेचा नियोजित पाणी पुरवठा १४ मेस केला जाईल. तसेच, १४ मेचा नियोजित पाणीपुरवठा १५ मेस होणार आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. उशिरा होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आहे.