Malegaon : पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; खंडीत वीजपुरवठ्याने नागरीक त्रस्त

Power supply Interruption repairing
Power supply Interruption repairingesakal

मालेगाव (जि. नाशिक) : गिरणा धरण परिसरात पहिल्याच वादळी पावसात वीजपुरवठ्याची (Power Supply) दाणादाण उडाली. गिरणा पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने गिरणा पंपिंग बंद झाले. बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाचला वीजपुरवठ्यात बिघाड झाला. गुरुवारी (ता. ९) दुपारी बारानंतर तब्बल १९ तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर (Water Supply) त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. (water supply disrupted due to interrupted power supply in Malegaon Nashik News)

माळमाथ्यासह तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळामुळे विजेचे खांब व तारांची पडझड झाली. गिरणा स्टेशनजवळील ३३ केव्ही लाईनवर उंबरदे गावाकडील कुशाबा मंदिराजवळ दोन ठिकाणी कंडक्टर तुटला होता. शेतात पावसाने चिखल झाला असल्याने रात्री काम करता आले नाही. सकाळी दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली. दुपारी बारापर्यंत काम पूर्ण झाले. तब्बल १९ तासानंतर वीजपुरवठा पुर्ववत झाल्याने गिरणा पंपिंग सुरु झाले. विजेच्या बिघाडामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. गिरणा पंपिंग सुरळीतपणे सुरू झाले असून, पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Power supply Interruption repairing
Nashik : जिल्हा परिषदेच्या 100 कोटींच्या निधी वर संक्रांत

शहरात गिरणा व चणकापूर अशा दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणातून थेट जलवाहिनीद्वारे ७० टक्के पाणी उचलले जाते. चणकापूर धरणाचे पाणी महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात येते. तळवाडे तलावातून ३० टक्के पाणी घेतले जाते. गिरणा योजनेत बिघाड झाल्यास संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा वारंवार बिघाड होतो. या वर्षी पहिल्याच वादळी पावसाने वीजपुरवठा खंडीत झाला.

Power supply Interruption repairing
अबब! कोंबड्याच्या खुराड्यात चक्क कोब्रा घुसला अन्...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com