Weather Forecast : जिल्ह्यात आजपासून 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Forecast

Weather Forecast : जिल्ह्यात आजपासून 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

नाशिक : शहर आणि परिसरात दुपारी ढगाळ हवामानासोबत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच, इगतपुरीच्या विभागीय कृषी केंद्रातर्फे बुधवारपासून (ता. १५) येत्या १९ मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast of light to moderate rain in district for 5 days from today nashik news)

या काळात हवामान ढगाळ राहणार आहे. जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारपर्यंत (ता. १६) विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलक्या ते मध्यम पाऊस अथवा गारपीट होण्याचा अंदाज केंद्राने वर्तवला आहे. या काळात कमाल तापमान ३३ ते ३४ आणि किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला ८ ते १३ किलोमीटर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता, स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची कापणीसह मळणी तत्काळ पूर्ण करायची आहे. कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेत अथवा ताडपत्रीने झाकून ठेवायचे आहे, हे स्पष्ट करत असताना केंद्राने पिकनिहाय काय काळजी घ्यायची याबद्दलचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :Nashikrainweather forcast